आधिक माहितीसाठी संपर्क साधा - +91 6364654114 +91 8217774696 +91 8105631829
मुख्य
आमच्या बध्दल
गोचर
टॅरो
प्रशंसा
सेवा
संपर्क
माझा नवीन लेख
माझा नवीन लेख
मुहूर्तावर बोलू काही. . . एखादे शुभ कार्य करण्याअगोदर आपण गुरुजींकडून त्याचा मुहूर्त काढून घेतो. विवाहाचा मुहूर्त, मुंजीचा मुहूर्त, बारशाचा मुहूर्त इतकेच काय तर आजकाल सिझेरियन ऑपरेशनचा देखील मुहूर्त काढून घेण्याची क्रेझ आहे. असे का तर हजारो वर्षांच्या अनुभवावरून आणि संशोधनातून आपल्या शास्त्रकारांनी कोणते काम कोणत्या वेळेला केले तर यशप्राप्ती ची शक्यता जास्त आहे हे सांगितले आहे. पण मुळात मुहूर्त म्हणजे काय याबद्दलचा हा लेख. ’मैं पल दो पल का शायर हूँ. . .’ ’हर घडी बदल रही है रूप जिंदगी..’ वगैरे गाणे तुम्ही ऐकली असतीलच. यामध्ये पल म्हणजे पळ, आणि घडी म्हणजे घटिका! पळ आणि घटिका ही वेळ मोजायची साधन होती किंवा वेळ मोजायचं एकक होतं. एक घटिका म्हणजे 24 मिनिटे आणि अशा दोन घटिका मिळून बनतो तो एक मुहूर्त! मग लक्षात घ्या की मुहूर्त म्हणजे काल मापन करण्याचे एक साधन आहे. तुम्ही ऐकले असेल घटिका भरली. . पळे भरली वगैरे. म्हणजे एक मुहूर्त = अठ्ठेचाळीस मिनिटे. चोवीस तासांमध्ये 1440 मिनिटे असतात. म्हणजेच 24 तासात ३० मुहूर्त आपल्याला मिळतात. त्यातील काही मुहूर्त शुभ असतात तर काही अशुभ. कोणत्या कामाला कोणता मुहूर्त वापरावा हेही शास्त्रकारांनी सांगून ठेवले आहे. तुम्ही लोकांना बोलताना ऐकले असेल की ’मी ब्रह्म-मुहूर्तावर उठतो’ म्हणजे पहाटे लवकर उठतो असा त्याचा अर्थ आहे का? तर ब्रह्म नावाचा मुहूर्त हा पहाटे असतो. म्हणून तो ब्रह्म मुहूर्त. इतका सोप आहे हे!!! मागच्या काही खजाना मध्ये मी तुम्हाला तुम्हाला योग्य आणि चांगले असलेले नक्षत्र कुठले आणि नुकसान देणारे नक्षत्र कुठले हे सांगितले. मागे मी होरा या बद्दल सुद्धा बोललो. बऱ्याच लोकांनी याचा फायदा झाल्याचा अभिप्राय दिला. कुठलेही महत्त्वाचे काम करत असताना आपण मुहूर्त कसा आहे किंवा आहे का हे बघतो. माझा सगळा प्रयत्न हा तुमचा तुम्हाला मुहूर्त काढता आला पाहिजे हा आहे. याचबरोबर ज्योतिषातील क्लिष्ट गोष्टी सोप्या करून समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील आहे. त्याने काय होईल तुमचं तुम्हाला कळेल की एखादी वेळ योग्य आहे की अयोग्य आहे आणि योग्य असेल तर कुठल्या कामाला योग्य आहे. याकरता काय लागणार आहे तर एक हिंदू कॅलेंडर ज्यामध्ये प्रत्येक दिवशी चा सूर्योदय आणि नक्षत्र नमूद असावे. इतक्याच माहितीवर आपण आपले मुहूर्त काढणार आहोत. मुळात एखादा दिवस मला खूप चांगला गेला. .सगळी कामे वेळेवर पूर्ण झाली असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नक्की काय होत? आपण योग्य वेळी काम सुरु केलेले असते. आणि त्यामुळे रिझल्ट चांगला मिळतो. आजही बाळाचं पहिलं अन्नप्राशन, कान टोचणे, नामकरण, उपनयन, व्यवसाय सुरू करणे, विवाह, वाहन खरेदी, भूमिपूजन, गृहप्रवेश अशा अनेक गोष्टींना आपण मुहूर्त बघतोच. काही लोक म्हणतील की इमर्जन्सी असेल, डॉक्टर कडे जावे लागले असेल, हॉस्पिटल मध्ये दाखल होणे हे सुद्धा मुहूर्त बघून कराव की काय? नाही. अशा वेळेला परमेश्वराचे नामस्मरण करून ते काम केलेले बरे. महा उपाय: वाईट स्वप्ने पडत असतील, स्वप्नामध्ये साप दिसणे, प्रेत दिसणे असा प्रकार होत असेल तर एक नारळ दत्त मंदिरात श्री दत्तात्रेयांच्या चरणांना लावून घरी आणावा. सगळ्यांच्या डोक्याला स्पर्श करून झाल्यानंतर त्या नारळाची अष्टगंधा ने पूजा करावी. तो नारळ एका वाटीत उभा ठेवावा. त्रास कमी झाल्यानंतर वाहत्या पाण्यात सोडावा.